Pimpri : पाणी उकळून, गाळून प्या; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना नदीत सध्यस्थितीत गढूळ पाणी येत असून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.

मावळातील पवना धरणातून पवना नदीत पाणी सोडले जाते. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुद्ध करून शहरातील विविध भागातील टाक्‍यामध्ये वितरित केले जाते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे धरणातून पाणी न सोडता नदीतील पाणी महापालिका उचलते.

Pune Crime: पुण्यात व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तसेच पवना नदीत येणाऱ्या पाण्यात गढूळपणा वाढला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी शुद्ध केले जात आहे. हे पाणी पिण्यासाठी पुर्णपणे योग्य आहे. त्यानंतरही नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी उकळून आणि गाळून घ्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले. दरम्यान, पवना धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या (Pimpri) वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.