Pune Crime: पुण्यात व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सात टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारावर पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने  सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime) प्रशांत सुरेश तोलगेकर (रा.हिंगणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Madhukar Babar : माजी नगरसेवक मधुकर बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोकसभा

तोलगेकर याचे सिंहगडरोड येथे तोलगेकर ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. फिर्यादी यांनी तोलगेकरकडून 20 नोव्हेंबर 2020 साली सात टक्के व्याजाने 87 हजार रुपये घेतले होते.यावेळी तोलगेकर याने फिर्यादीकडून गहाण स्वरूपत कार व फ्लॅटचे कागदपत्रे ठेऊन घेतले होते.(Pune Crime) आरोपीने दोन वर्षात व्यवहारापोटी 4 लाख वसूल केले तरी अद्याप सात लाख बाकी आहेत असे सांगत पैशासाठी तगादा लावला आहे. यावरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणीविरोधी पथक पुढील तपास करीत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.