Pune Extortion Case: माथाडी संघटनेचा खंडणीखोर अध्यक्ष पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज: ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या एका माथाडी संघटनेच्या अध्यक्षाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.ओंकार रमेश हिंगे (शिवतेज नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Extortion Case) बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका व्यावसायिकाकडे चाळीस हजार रुपये खंडणीची मागणी केली होती. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार हा स्वराज शिलेदार माथाडी संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यांनी धायरी गाव येथील एका व्यावसायिकाला लेबर कॉन्ट्रॅक्टर चे काम करायचे असेल तर महिन्याला 40 हजार रुपयांची दे असे सांगितले होते.  दरम्यान तक्रारदार व्यक्तीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.

CM Eknath Shinde : उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स अनिवार्य

 

गुन्हे शाखेकडे याबाबतचा अर्ज आला असता पोलिसांनी त्याची शहानिशा करून कारवाईचा प्लॅन तयार केला. आरोपीने फिर्यादीला फोनवर संपर्क केला. वेळोवेळी त्यांच्या गाड्या अडवल्या. आणि माझ्या एरियात लेबर कॉन्ट्रॅक्टर चे काम करायचे असल्यास महिन्याला चाळीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. (Pune Extortion Case) त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 30 हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.