Pune : कोयत्याच्या धाकाने खंडणी मागणारे तिघे जेरबंद; हडपसर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – मिठाईच्या दुकानात प्रवेश करून रेड बुल आणि बाकरवडी विकत घेत त्याचे पैसे मागितल्याने दुकानदाराकडे (Pune) कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.
अजय उर्फ अज्याभाई विजय साळुंखे ( वय 20 वर्ष),  शुभम मधुकर गवळी (21 वर्ष), सुदाम लक्ष्मण साळुंखे (21 वर्ष) सर्व रा . हडपसर, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हिरा राम चेनाराम देवासी, (वय 34 वर्ष ,धंदा व्यवसाय, राहणार- रुक्मिणी कॉम्प्लेक्स शेवाळवाडी चौकाजवळ शेवाळवाडी मांजरी पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे मांजरीतील शेवाळवाडी परिसरात चैतन्य स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी या दुकानात गेले आणि त्यांनी बाकरवडी आणि रेड बुल यासारख्या वस्तू घेतल्या.
येथे जर धंदे करायचे असतील तर प्रत्येकाने आम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतील नाहीतर एकेकाला त्याच्या दुकानासोबत फोडून टाकू” अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर (Pune) पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.