Pune: रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता – पराग गोखले

एमपीसी न्यूज – श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत (Pune)व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात 102 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. तसेच देशभरात 757 ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ 3 सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.  

 

गदापूजनाचे कार्यक्रम पुणे शहर तसेच सासवड, मंचर, भोर आदी ठिकाणी झाले. भिकारदास(Pune) मारुती मंदिर, पुणे येथील गदापूजन कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पूज्य मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली, यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक.सुनील घनवट हेही उपस्थित होते.

यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला.

 

तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शन ही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

Akurdi :  सत्तामेव जयतेसाठी भाजपची लढाई – आदित्य ठाकरे

 

तसेच अन्य ठिकाणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.