Pune : गळ्याला मांजा अडकल्याने दोन पोलीस गंभीररित्या जखमी

एमपीसी न्यूज : पतंग उडविण्यासाठी मांजा वापरण्यावर (Pune) बंदी असतानाही सर्रास मांजाचा वापर होताना दिसतोय. यामुळे यापूर्वी अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. पुण्याच्या धनकवडी परिसरातूनही अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. मकर संक्रांति निमित्त पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर केल्यामुळे दोन पोलीस गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी घडली. 

Pune Crime : दोघांवर एकीचं प्रेम, दोघांनी मिळून केला तिचा गेम

सुनील गवळी आणि महेश पवार असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उडानपुरावर हा अपघात झाला. हे दोन्ही मुख्यालयात नेमणुकीस असून नियुक्तीसाठी ते निघाले होते. दुचाकीवरून जात असताना शंकर महाराज उडानपुलावर पोलीस कर्मचारी महेश पवार यांच्या गळ्याला मांजा अडकला. तर सुनील गवळी यांचा हात मांजाने कापला.

दरम्यान याच वेळी पुलावरून पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले हे जात होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी तातडीने या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या दोघांवरही आता उपचार सुरू आहेत. दरम्यान मांजा विक्रीवर बंदी असतानाही चोरीच्या मार्गाने नायलॉन (Pube) मांजाची विक्री केली जात आहे. त्यामुळे पतंग उडताना सर्रास मांजाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.