Pune : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ‘वाचन अभिवादन’ करण्याचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीदिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील ‘वाचन अभिवादन’ करून जयंती साजरी करावी, असे आवाहन ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ने केले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण घराबाहेर पडू शकत नाही. याबद्दल भावनिक होऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नका,गर्दी करू नका.शासनाच्या आदेशाचे पालन करणे म्हणजेच संविधानाचा आदर राखणे होय.

14 एप्रिल या डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वलिखित व इतर लेखकांची त्यांचा जीवन कार्यावरील ग्रंथ आपण आपल्या घरीच थांबून अभ्यासावे. सोशल डिस्टन्सिंग, ठेवून सॅनिटायझर -मास्क,अन्नाचे गरजूना वाटप करावे,मुख्यमंत्री निधीला मदत करावी, असे पत्रकाद्वारे उत्कर्षा शेळके यांनी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.