Kalewadi News : तापकीर शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील तापकीर चौक येथे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्या संकल्पनेतून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विमलसन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उमेश शिंदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रुतीका नवसरे, प्राजक्ता चंदे ,अदिती गरड, अनुष्का भोसले, अंजली सूर्यवंशी व इतर विद्यार्थिनी नमो गौतमा या गाण्यावर नृत्य केले.

सार्थक हांडे, श्रुती गोरखे, प्रणिता जगताप, शिवानी शिंदे,अक्षता ढेंगळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. गायत्री ढेपे, पूनम इथापे, श्रद्धा मोरे, सायली सकटे या विद्यार्थीनी गायन व पेटीवादन केले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व भीमगीतावर नृत्य केले.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात तापकीर, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, मराठवाडा युवा मंचचे बाळासाहेब गायकवाड, विमलसन्सचे निलेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन कै श्री भाऊसाहेब तापकीर शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका जयश्री पवार, उल्का जगदाळे, रवींद्र बामगुडे, पूनम कांबळे व इतर शिक्षकांनी केले. सूत्रसंचलन श्रीमती सोनटक्के यांनी केले. अल्पोपहार वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.