Pimpri News : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरीत लोटला भीमसागर

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे दोन वर्षातील खंडानंतर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज (गुरुवारी) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून भीमसागर लोटला आहे. मागचे 2 वर्ष जयंती साजरी करता आली नाही. मात्र, या वर्षी विविध सामाजिक आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून अभिवादन केले जात आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महामानवास अभिवादन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रतिमेस आणि पिंपरी, एच.ए. कॉलनी, व दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समवेत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य संयोजक संजय भोसले, ह क्षेत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक तसेच गणेश भोसले, तुकाराम गायकवाड आदि उपस्थित होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी भाजपातर्फे अभिवादन

जातीव्यवस्था आणि अस्पृष्यतासारख्या समाजविघातक प्रवृत्तीविरोधात लढण्याची ताकद निर्माण करणारे जगातील एकमेवादित्य राजकीय व्यक्तीमत्व आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले.

भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महपौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, विजय फुगे, अनु. जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, अनु. जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, अनु. जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे, महिला आघाडी प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, शहर उपाध्यक्ष समीर जावळकर, प्रदीप बेंद्रे, ओबीसी आघाडीचे सरचिटणीस कैलास सानप, कोमल काळभोर, सुभाष रणसिंग, युवामोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, मंडल अध्यक्ष महादेव कवितके, विजय शिनकर, नंदू भोगले, कविता हिंगे, रेखा कडाली, अनिल लोंढे, जयश्री मकवाना, कोमल गौडाळकर, शुभांगी कसबे, राधिका बोर्लीकर आदी उपस्थित होते.

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने वही-पेन संकलन अभियान

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने अनोखे वही-पेन संकलन अभियान राबविण्यात येत आहे. शिका, संघटित व्हा या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिवादन करण्यासाठी आलेले भीमसैनिक वही-पेन मंचाकडे जमा करत आहेत. सकाळपासून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कुदळवाडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती कुदळवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, संतोष मोरे, भाऊसाहेब रोकडे, गणेश यादव, प्रकाश चौधरी, विजय तापकीर, सुरेश वाळुंज, श्याम थोरात, शरद गोरे ,दिपक घन, गौरव त्रिपाठी,मोईद शेख,वैभव वाघ, प्रकाश चौधरी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

तापकीर शाळेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. उमेश शिंदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी श्रुतीका नवसरे, प्राजक्ता चंदे ,अदिती गरड, अनुष्का भोसले, अंजली सूर्यवंशी व इतर विद्यार्थिनी नमो गौतमा या गाण्यावर नृत्य केले. सार्थक हांडे, श्रुती गोरखे, प्रणिता जगताप, शिवानी शिंदे,अक्षता ढेंगळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. गायत्री ढेपे, पूनम इथापे, श्रद्धा मोरे, सायली सकटे या विद्यार्थीनी गायन व पेटीवादन केले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व भीमगीतावर नृत्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घोष वादनाने ( बॅंड पथक ) मानवंदना देण्यात आली. यावेळी घोषावर विविध रचनांचे वादन करण्यात आले.

डॉ. आंबेडकर जयंती दिनी आझम कॅम्पसचा अभिवादन कार्यक्रम

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले .

डॉ. पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख ,एस ए इनामदार, डॉ नाझीम शेख, महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट,महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन एंड रिसर्च सेंटर तसेच अवामी महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य ,प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले.

पिंपळेगुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समता सप्ताहानिमित्त संविधान प्रतींचे वाटप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाची प्रत देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. दरम्यान, शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना संतोष चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची पुस्तके भेट देण्यात आली.

माजी नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अनुसूचित जमाती सेलचे शहराध्यक्ष विष्णू शेळके, शहर सामाजिक न्याय विभागाध्यक्ष विनोद कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिलेवार, तानाजी जवळकर, मुकेश पवार, नितीन सोनवणे, जावेद शेख, सतिश चोरमले, पकाश पवार, महेश माने, निसार शेख, आरिफ शेख, संतोष रायचूरकर, मोनिका जाधव, प्रभागाध्यक्षा संजीवनी पुराणिक, विनय शिंदे, वैशाली ढोरे, सुनिता अळसुळे, शैलेश दिवेकर, मंगेश शेळके आदी उपस्थित होते.

यमुनानगर रूग्णालयास पिण्याच्या पाण्याचे फ्रिज भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अरुण जोगदंड यांच्याकडून सेक्टर 22 मधील महापालिकेच्या दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचे मशीन बसवण्यात आले. रुग्णालयात पेशन्ट व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाणी मिळावे. महिला प्रसुतीगृहात गरम पाण्याची खुप गरज सतत भासत होती. त्यामुळे नागरीकांची व डॉक्टरांची तारांबळ उडत होती. या गोष्टी लक्षात घेत रुग्णालयात गरम,थंड व मध्यम अशा तीन प्रकारचे पाणी एकच मशीन उपलब्ध करेल अशी पाण्याची मशीनचे उद्घाटन कामगार नेते, महाराष्ट्र शासन कामगार सल्लागार समिती सदस्य इरफान सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.राजेंद्र फिरके, डॉ. ढगे व सेक्टर 22 मधील सामाजिक कार्यकर्ते सुशील गवळी, सनी पवार , रवी खैरनार, विजय साळवे , नियाज खान,संजय ससाणे, विशाल पाटील, गणेश वाघमारे किरण गंडले, मंगेश धिवार, बाबु संगोळगीकर, साकित ढावरे, सतीश कदम आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघ आणि गोविंद खामकर मराठा सेवा संघाकडून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

 

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 व्या जयंती निमित्त त्यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे आणि गोविंद खामकर मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे , सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक सातपुते , जगतगुरु तुकोबाराया साहित्य परिषदेच्या अध्यक्ष गोविंद खामकर , उपाध्यक्ष प्रकाश बाबर , सचिव सचिन दाभाडे , अँड सुनील रानवडे , कायदा सेल चे अध्यक्ष अँड श्रीराम डफळ, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे , शहर अध्यक्षा स्मिता म्हसकर , सौ. सातपुते , अँड सुनीता रानवडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.