Talawade News : लाईट गेली अन् महावितरणच्या शाखेतच झाली मोठी चोरी

एमपीसी न्यूज – खांबावरून ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील ताब्यांची तार व ऑईलची चोरी केली. विशेष म्हणजे तळवडे येथील महावितरणच्या शाखेतच लाईट गेल्यावर मंगळवारी (दि. 12) रात्रीच्या वेळीस ही चोरीची घटना घडली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या तळवडे शाखेच्या निकिता मधुकराव इंगोले (वय 32) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी लाईट गेल्यावर अंधाराचा फायदा घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण शाखेच्या तळवडे कार्यालय येथील 100 के.व्ही.ए ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली उतरवला. ट्रान्सफॉर्मरमधून 2 लाख 67 हजार 500 रूपये किंमतीच्या तांब्याच्या तारा व ऑईल याची चोरी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.