Chinchwad News : विविध उपक्रमांनी महावीर जयंती साजरी

एमपीसी न्यूज – जैन संघटनांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहेत. अहिंसा रॅली, भजन संध्या, अहिंसा पुरस्कार वितरण आणि भक्ती संगीत स्पर्धा पुरस्कार वितरण केले जाणार आहे. तसेच बिजलीनगर येथे मुमुक्षुचा सन्मान व माता त्रिशाला माई रमा पुरस्काराचे वितरण होणार आहे.

विनोद जैन यांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. आदेश्वर जैन मंदिर ट्रस्ट येथून गुरुवारी (दि. 14) सकाळी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पुढे चिंचवड स्टेशन महावीर चौक येथून नूतन धर्मशाळा पर्यंत काढण्यात आली. यावेळी अध्यक्ष दिलीप पालरेजा, उपाध्यक्ष व खजिनदार राजेश सोलंकी, सचिव तुषार रांका, विनोद जैन, अल्पेश सोलंकी, इंदरमलजी पुनमिया, राजू रांका उपस्थित होते. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वाटप झाले.

पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष सुरेश गदिया म्हणाले, “पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने अहिंसा रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कारांचे वितरण होणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड, माजी आमदार उल्हास पवार, मनोज देवळेकर, सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.”

पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोक पगारिया म्हणाले, “दुपारी साडेतीन वाजता भगवान महावीर यांचे दिगंबर जैन मंदिर निगडी येथून अहिंसा रॅली सुरु होईल. पुढे ही रॅली म्हाळसाकांत चौक -आकुर्डी गाव – चिंचवड स्टेशन – विशाल थीएटर पिंपरी -लिंक रोड -चापेकर चौक -चिंचवडगाव – प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह या मार्गावरून जाईल.

रामकृष्ण मोरे सभागृह येथे रॅलीचा समारोप होईल. सभागृहात भजन संध्या हा सांस्कृतिक भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. अहिंसा पुरस्कारांचे वितरण देखील यावेळी होणार आहे. पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या भक्ती संगीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी होणार आहे.

बिजलीनगर येथे महिलांचा सन्मान

श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स व स्वानंद महिला संस्था यांच्या वतीने बिजलीनगर चिंचवड येथे भगवान महावीर जयंती निमित्त समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महिलांचे व आत्म कल्याणासाठी साधूत्वाचा मार्ग स्वीकारणाऱ्या शारदा छाजेड, अंकिता लुनिया या भगवती जैन दिक्षा घेण्याचा निर्धार करणाऱ्या मुमुक्षुचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्य करणा-या महिलांचे माता त्रिशला व माई रमा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रमुख पाहुणे जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश चोरडिया, जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रुचिरा सुराणा, चोरडिया, माजी राष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रा अशोक पगारिया, बिबेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नितीन चोपडा, सुभाष ललवाणी, प्रा. प्रकाश कटारिया, जैन महासंघाचे अध्यक्ष सुरेश गदिया, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सागर सांकला, नितीन ओस्तवाल, सुवालाल बोरा , देवेंद्र बाकलीवाल, सुभाष सुराणा, राजेंद्र बांटिया, राजेंद्र चोरडिया राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा लता पगारिया, कुसुम भंडारी, कल्पना कर्नावट नितेश फुलपगार, कीर्ती कर्नावट आदी उपस्थित होते.

हिराबाई हरकचं ओस्तवाल, शैलजा विनायक कुलकर्णी, अचला सुरेश शहा, विमल पोपटलाल गदिया, सुगनाबाई बुधमलची नहार यांना माता त्रिशाला व माई रमा पुरस्काराने गौरविण्यात आले.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, स्त्रियांनीच आपल्या संस्कार व संस्कृतीचे जतन करून भरणपोषण केले आहे. म्हणूनच भारतावर अनेक आक्रमणे होऊन सुद्धा भारतीय संस्कृती टिकून आहे.

रुचिरा सुराणा म्हणाल्या, स्त्रिया जीवनभर समर्पित मनाने काम करत असतात. आज या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे, तो खरोखरच महत्त्वाचा असून जीवनाच्या उत्तरार्धातील त्यांचा महिलांनी महिलांचा केलेला सन्मान हा विकासाची, प्रगल्भतेची जाण देणार आहे.

अविनाशजी चोरडिया यांनी मुमुक्षु आत्माचे अभिनंदन केले. प्रा. डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा, स्वानंद पिंपरी चिंचवडच्या संस्थापक प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले.

अजमेरा मधील प्रगती महिला मंडळाने महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम साजरा केला. यावेळी पाणपोईचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा सुरेखा कटारिया, सुनिता बोरा, साधना टाटिया, साधना सवाने, सुजाता नवले यांनी केले. आभार प्रदर्शन साधना सवानीने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.