Bhosari Crime News : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 3 कोटी 10 लाख रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून व्यवसायात पैसे गुंतवण्यास भाग पाडले. परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता 3 कोटी 10 लाख रूपयांची फसवणूक केली. 08 सप्टेंबर 2017 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत भोसरी परिसरात ही घटना घडली.

याबाबत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वप्निल बालवडकर (रा. बालेवाडी) या इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या मुलांचा विश्वास संपादन करून रॉयल इन्फिल्ड बुलेट व एमएस पायोनिअर मल्टी सर्व्हिसेस अॅन्ड प्रोप्रायटरशीप या दोन व्यवसायात तीन कोटी 10 लाख रूपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याची प्रॉमिसरी नोट केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता 3 कोटी 10 लाख रूपयांची फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.