मान्सूनबाबत गूड न्यूज; 99 टक्के बरसणार

एमपीसी न्यूज – मान्सूनबाबत हवामान खात्याने गूड न्यूज दिली असून तो यंदा सरासरीच्या 99 टक्के बरसणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमधील हा पावसाचा पहिला अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे.पावसाची ही टक्केवारी म्हणजे यंदा चांगला पाऊस होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पावसाबाबतचा हा अंदाज म्हणजे शेतकरीवर्गासाठी आनंदाची बातमी आहे.सरासरीच्या 99 टक्के पाऊस म्हणजे 2020 पर्यंत गेल्या 50 पन्नास वर्षांपर्यतच पाऊसमान काढल तर ते साधारण 868 मीलीमीटर इतक आहे.याच्या सरासरीच्या 99 टक्के म्हणजे हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो.त्यामुळे यंदा पाऊस चांगला असेल असं मानले जात आहे.

वर्षभरात जो पाऊस पडतो त्यापैकी 74 टक्के पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यात पडतो.हा पाऊस शेतकरीवर्गासाठी चांगला मानला जातो. हे चार महिने शेतकरी आणि भारतीयांसाठी चांगले मानले जातात.सध्या जर चांगला पाऊस राहीला तर सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसू शकेल म्हणून तो दिलासादायक ठरेल असं मानलं जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.