Pune Voting : एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध

एमपीसी न्यूज : भारत निवडणूक आयोगाने 215 – कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील (Pune Voting) पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे दिनांक 16 फेब्रुवारी रोजीच्या सकाळी सात ते दिनांक 27 फेब्रुवारीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे (Pune Voting) अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

India News : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत 3,384 अब्ज रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.