India News : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत 3,384 अब्ज रुपये

एमपीसी न्यूज : स्मार्टफोन, लॅपटॉपपासून (India News) ते इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी आवश्यक असणारा लिथियम या दुर्मीळ खनिजाचा 59 लाख टनांचा साठा जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात सापडला आहे. याची एकूण किंमत 3,384  अब्ज इतकी प्रचंड आहे.

लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये केला जातो. भारतात झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जम्मूच्या सलाल-हिमाना या भागामध्ये हा खजिना सापडला आहे. इथे एकूण 51 ब्लॉक सापडले आहेत. यापैकी 5 ब्लॉक्स लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे आहेत.

इतकंच नाहीतर 17 ब्लॉक हे कोळश्याच्या साठ्याचे असल्याचंही सांगण्यात येत आहे. खरंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणं ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, लिथियमचे अनेक फायदे आहेत. पण या सगळ्यात रिचार्ज करणाऱ्या बॅटऱ्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक वेगाने आणि स्वस्तात उतरवण्याच्या सरकारच्या योजनेला बूस्टर मिळणार आहे. सध्या भारत लिथियमसाठी ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनावर अवलंबून आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा (जीएसआय) हा शोध देशासाठी अत्यंत मोलाचा आहे.

भारत लिथियमची मोठ्या प्रमाणात आयात करतो. 2020 पासून लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारत लिथियम-आयन बॅटरीसाठी लागणारी 80 टक्के सामग्री चीनकडून आयात करतो.

Pune Crime : आमदार माने यांच्या खबरदारीने ‘सेक्स्टॉर्शन’चे रॅकेट उघडकीस; 80 लोकांकडून 1 लाख रुपयांची मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.