Jammu : पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार; दहशतवादी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

एमपीसी न्यूज : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील देहरा की गलीजवळ गुरुवारी (Jammu) संध्याकाळी अतिरेक्यांनी सैन्याच्या वाहनांवर हल्ला केल्याने तीन लष्करी जवान शहीद झाले आणि तीन जण जखमी झाले.

गुरूवारी संध्याकाळी लष्कराने सांगितले की, 20 डिसेंबरच्या रात्रीपासून डेरा की गली या भागात कारवाई करण्यात येत होती. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास, सैन्याची दोन वाहने ऑपरेशनल साइटकडे जात होती. ज्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने या हल्ल्यावर लगेच प्रत्युत्तर दिले.

Maharashtra : कोरोना जेएन-वन व्हेरिएंट; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

भारतीय सैन्य जिप्सी आणि एक मिनी ट्रकसह सुरनकोटमधील बुफलियाज येथून राष्ट्रीय रायफल्सचे मुख्यालय असलेल्या राजौरी येथील थानमंडीकडे जात होती.

चकमक सुरू झाल्यानंतर घटनास्थळी 48 आरआर आणि 43 आरआरच्या जवानांसह रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. परिसरात रहदारी थांबवण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.