Alandi : श्री इंद्रायणी माता परिक्रमे बद्दल नवनाथ महाराज आहेर यांना इंद्रायणी सेवा रत्न पुरस्कार

एमपीसी न्यूज – राघव नर्मदा परिक्रमा आयोजित दि. 11 डिसेंबर रोजी पुण्य सलीला श्री इंद्रायणी माता पायी प्रदक्षिणेला (परिक्रमा ) आळंदी येथून (विश्व शांती केंद्र)सुरवात झाली.

ती आळंदी, देहू, वडगांव मावळ, कुरवंडे अशी (दुतर्फा प्रवास करत) परिक्रमा करत आळंदी (खेडभाग ) येथे पोहचली. या परिक्रमेत इंद्रायणी नदी जलप्रदूषणमुक्तीपर प्रबोधन, स्वच्छता जनजागृती व इंद्रायणी महात्म्य सांगितले जात आहे.

आज दि.21 रोजी आळंदी मध्ये इंद्रायणी सेवा फाऊंडेशन च्या वतीने त्या परिक्रमेचे आयोजक नवनाथ महाराज आहेर व सीमाताई आहेर यांना इंद्रायणी सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे विठ्ठल शिंदे, शिरीष कारेकर, सुनील वाघमारे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,जनार्दन पितळे, प्रभाकर तावरे, अरुण बडगुजर, नवनाथ काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा नंतर तुळापूरकडे श्री इंद्रायणी माता परिक्रमेच्या सोहळ्याने प्रस्थान केले.

दि.11 रोजी श्री इंद्रायणी माता प्रतिमेचा अनावरण सोहळा सद्गुरू जोगमहराज वारकरी शिक्षण संस्थेत पार पडला होता.त्याच दिवशी ती श्री इंद्रायणी मातेची प्रतिमा रथात विराजमान करत हरिनामाच्या गजरात या परिक्रमेला आळंदी येथून सुरुवात झाली होती.दि.23 रोजी आळंदी(हवेली विभाग, विश्व शांती केंद्र ) येथे परिक्रमा पूर्ण होत असून श्री सिद्धेश्वरास जल चढून त्याची सांगता होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.