Today’s Horoscope 22 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख- 22.12.2023.

शुभाशुभ विचार- 20 पर्यंत चांगला दिवस. 

आज विशेष – मोक्षदा एकादशी, गीता जयंती.

राहू काळ – सकाळी 10.30  ते  12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – अश्विनी 21.36 पर्यंत नंतर भरणी.

चंद्र राशी – मेष.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी )

आज तुमचं मनोबल उत्तम असून तुमची सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. आज तुम्ही रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल.

वृषभ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सतर्क रहा.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. काही खोटी स्तुती करणारे भेटतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यस प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

सिंह – ( शुभ रंग – क्रीम)

दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे जाणे योग्य ठरणार नाही. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आज ताकही फुंकूनच प्यावे.

तूळ – ( शुभ रंग- निळा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल.

धनु – (शुभ रंग- भगवा)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल.

मकर- ( शुभ रंग – आकाशी)

कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागेल. गृहणी आज मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन एकोपा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम ठेवावा लागेल.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.