Pune : वारजेकरांनी केलेला सत्कार महत्वपूर्ण -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – कोथरूड-वारजे भागाला महापौर पदाचा मान प्रथमच मिळाला आहे. आमचा माणूस महापौर झाला म्हणून कौतुक सोहळा करतायेत. त्यामुळे उत्साह वाढतोय. आपल्या अपेक्षा भविष्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

या सत्काराचे आभार मानणार नाही तर, ऋण व्यक्त करतो. सुमारे 40 लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करीत असून सर्वांना सोबत घेऊनच काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. पुण्यनगरीच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल मंगळवारी रात्री वारजे-माळवाडी गौरव समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी काँगेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आयोजक महेश बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका वृषाली चौधरी, माजी सरपंच बापूसाहेब बराटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक किरण बारटक्के, वारजे-माळवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माणिक दुधाने, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी, बाबा खान, युनिव्हर्सल ग्रुपचे प्रमुख रोहिदास मोरे, पंढरपूर देवस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पागे उपस्थित होते. संतोष तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.