Pune : दुकानाच्या शटरने वाचवले तरुणाचे प्राण

एमपीसी न्यूज- खुन्नसने बघितल्याचा कारणावरून जमावाने हातात कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला खरा, पण सुदैवाने तरुणाने एका दुकानात शिरून शटर खाली ओढल्याने तो बचावला. एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग पुणे-सातारा रस्त्यावर स्वारगेट परिसरामध्ये सोमवारी (दि.२८) संध्याकाळी घडला.

या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणाने फिर्याद दाखल केली आहे.

एकमेकांकडे खुन्नसने बघितले म्हणून तक्रारदार तरुणाचे त्या जमावाबरोबर भांडण झाले. संबंधित तरुण संध्याकाळी घरी जात असताना, तरुणांच्या गटाने हातात कोयता घेऊन त्याचा पाठलाग केला. सुदैवाने तरुणाने एका दुकानात शिरून शटर खाली केल्यामुळे बचावला. त्याला बाहेर काढण्यासाठी जमाव शास्त्राच्या साहाय्याने शटर शस्त्राने तोडण्याचा प्रयत्न करत होते.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. सर्व आरोपींची ओळख पटली आहे. त्यापैकी तीन ते चार आरोपी अल्पवयीन आहेत. एखाद्या सिनेमात शोभून दिसेल अशा प्रसंगामुळे नागरिक मात्र भयभीत झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.