Pimpri : जागतिक कर्करोग दिवसानिमित्त रविवारी” कॅन्सर रन”

एमपीसी न्यूज- समाजामधे कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आकुर्डी येथील स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने येत्या रविवारी (दि. ३) कॅन्सर अवेअरनेस रन” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक कर्करोगतज्ञ डॉ राकेश नेवे यांनी दिली.

दरवर्षी चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतामध्ये कर्करुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत आहे. समाजामधे कर्करोगविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आकुर्डी येथील स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे रविवारी (दि. ३) सकाळी साडेसहा वाजता अप्पूघर चौक निगडी येथून ” कॅन्सर अवेअरनेस रन” चे आयोजन करण्यात आले आहे.

3 किलोमीटर , 5 किलोमीटर व 10 किलोमीटर अशा तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या “फन रन” मध्ये नागरिक संपूर्ण कुटुंबासहित सहभागी होऊ शकतात.  सहभागासाठी प्रतिव्यक्ति रुपये दोनशे असे शुल्क ठेवण्यात आले असून http://www.sterlingmultispecialityhospital.com/marathon या संकेतस्थळावर पूर्व नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सुत्रांवर सामाजिक जागरूकता करणे अत्यावश्यक आहे. कर्करुग्णांचे प्रमाण कमी करणे व कर्करोगामुळे होणारा मृत्युदर कमी करणे हा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे. 2019 ते 2021 या तीन वर्षांसाठी “आय एम ; आय विल ” ( I Am and I Will ) अशी जागतिक घोषणा असणार आहे. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या “रन” साठी नावनोंदणी करावी असे आवाहन डॉ राकेश नेवे यांनी केले आहे. सहभागी प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.