Pune : मुळशी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिंचोली गावाजवळील मुळशी धरणाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

प्रणव मिश्रा (वय 29) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मिश्रा हा हिंजवडी येथील असून सोमवारी तो आपल्या मित्रांसमवेत मुळशी धरणावर फिरायला आला होता. या मित्रांपैकी काहीजण पाण्यात पोहोण्यासाठी उतरले तर काही काठावरच बसून होते. हे सर्व मित्र फोटो काढण्यामध्ये दंग असताना प्रणव मिश्रा पाण्यात बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. नंतर प्रणव गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही.

त्वरित या घटनेची माहिती एनडीआरएफ टीमला देण्यात आली. एनडीआरएफच्या टीमने सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिवसभर त्याचा शोध घेतला. अखेर मंगळवारी प्रणवचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.