Indori Accident : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी (Indori Accident) पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे इंद्रायणी नदीपात्रात एक कार पडली. ही घटना शुक्रवारी (दि. 27 मे) पहाटे घडली आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

संजय पुनमचंद बोरसे (वय 44, रा. स्वामी समर्थ मंदिर, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे संजय बोरसे हे त्यांच्या कारमधून तळेगाव-चाकण रोडने जात होते. इंदोरी कडून तळेगावकडे जात असताना इंदोरी गावाजवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलावर संजय यांचे नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Indori Accident

Talegaon News : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कोसळली कार; एकाचा मृत्यू

कार पाण्यात पडल्यानंतर कारचे (Indori Accident) दरवाजे बंद असल्याने संजय हे कारच्या खिडकीतून बाहेर आले. मात्र, त्यांचा त्यात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना कार पाण्यात पडलेली आणि कारपासून काही अंतरावर नदीपात्रात एक मृतदेह दिसला. नागरिकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढली. तसेच संजय यांचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला. दरम्यान तळेगाव-चाकण मार्गावर वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गर्दी झाली होती.

बोरसे चाकण येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री बोरसे कंपनीतील काम संपल्यानंतर चाकणवरून तळेगावला घरी जात होते. दरम्यान, तळेगाव-चाकण रोडने जात असताना नदीपात्राच्या वळणावर त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीच्या पुलावरून पाण्यात पडली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.