Pune Drowning News : खळबळजनक! पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला हडपसरच्या कॅनॉलमध्ये

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या कालव्यात दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा (Pune Drowning) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला. मयुर बापू मरगळे (वय 13) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयूर सोमवारी खडकवासला धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला होता. त्याच्यासोबत लहान भाऊ आणि आणखी एक मित्र होता. मयूरला पोहता येत नव्हते तरीही तो पाण्यात उतरला होता. त्यानंतर पाण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणातच मयुर दिसेनासा झाला (Pune Drowning). त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या भावाने आणि मित्राने मयूरच्या आजोबांना याची माहिती दिली. आजोबांनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर दोन दिवस सातत्याने अग्निशमन दल आणि हवेली पोलिस त्याचा शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी हडपसर परिसरात त्याचा मृतदेह सापडला.

Vasant More : सोशल मीडियावर पुन्हा एकदा वसंत मोरे यांच्या ‘गुड’ कामाची चर्चा

मयूर आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. काम करत करत शिक्षण घेणारा मयूर अतिशय हुशार नम्र आणि मनमिळावू होता. आजोबांना पिठाच्या गिरणीवर तो मदत करत होता. पाच वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि आजोबांना मदत व्हावी यासाठी सकाळी लवकर उठून तो पेपर टाकण्याचे काम देखील करत होता. मयूर याचा मृत्यू ने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.