Hasan Shaikh Murder Case : हसन शेख खून प्रकरणातील कुख्यात गुंड मंगेश कदम हवेली पोलिसांना शरण

एमपीसी न्यूज – सासवड परिसरात 2019 मध्ये कुख्यात गुंड हसन शेख याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील (Hasan Shaikh Murder Case)  प्रमुख आरोपी मंगेश उर्फ भाईजी कदम खून झाल्यानंतर पसार झाला होता, अखेर तो पोलिसांना शरण आला आहे. बुधवारी सायंकाळी तो हवेली पोलिसात हजर झाला आहे. मंगेश कदम हा सराईत गुन्हेगार आहे. खून खुनाचा प्रयत्न मारामारी दहशत निर्माण करणे बेकायदा जमाव जमविणे खंडणी अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Pune Drowning News : खळबळजनक! पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला हडपसरच्या कॅनॉलमध्ये

सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगार हसन शेख याचा खून (Hasan Shaikh Murder Case)  करण्यात आला होता. या खून प्रकरणातील काही आरोपी अटकेत होते तर काही अजूनही फरार होते. यातील प्रमुख आरोपी मंगेश कदम हा तेव्हापासून फरार होता. ग्रामीण पोलिसांनी मंगेश कदम आणि त्याच्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई केली होती. मंगेश कदम याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला पकडण्यात यश येत नव्हते. अखेर बुधवारी सायंकाळी तो स्वतः पोलिसात हजर झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.