Vasant More : सोशल मीडियावर पुन्हा एकदा वसंत मोरे यांच्या ‘गुड’ कामाची चर्चा

एमपीसी न्यूज – पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) ही नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. बुधवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली ते त्यांनी केलेल्या एका चांगल्या कामामुळे. मंगळवारी रात्री ते भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेले असता त्यांना एके ठिकाणी पीएमपीएमएल बस उभी असल्याचं दिसलं. त्यामुळे वसंत मोरे यांना शंका आली आणि त्यांनी जवळ जाऊन विचारपूस केली असता ड्रायव्हरने त्यांना काय झालं ते सांगितलं.

ड्रायव्हरने सांगितले, ते आताच सासवड वरून आले होते. त्यांच्या गाडीत एक महिला आणि तिचे छोटे बाळ होतं. त्या कात्रज परिसरातच कुठेतरी रहात होत्या. कात्रज परिसरातील राजस सोसायटी जवळ आल्यानंतर त्यांचा दीर त्यांना घ्यायला येणार होता, परंतु तो न आल्यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर बराच वेळ उभे होते. रात्रीची वेळ आणि त्यात महिला एकटी त्यामुळे त्यांना घरी जाता येत नव्हते, असे ड्रायव्हरने वसंत मोरे (Vasant More) यांना सांगितले.

Pune News : वृद्ध आईच्या अंत्ययात्रेत मुलानेही सोडले प्राण, पुण्यातील घटनेने हळहळ

त्यानंतर वसंत मोरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला आणि तिच्या चिमुकल्या बाळाला स्वतःच्या गाडीत बसवले आणि घरी सुखरूप सोडले. वसंत मोरे यांनी या पीएमपीएमएल कंडाक्टर ड्रायव्हरचे आभार मानले. नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर अशी त्या दोघांची नावे आहेत.

खरं तर इतक्या रात्री नातेवाईकांनीही आपल्या घरातील महिलांना असे एकटे सोडू नये. कंडक्टर आणि ड्रायव्हर ने आपलं भावासारखं नातं या वेळी दाखवून दिलं आणि त्या महिलेसोबतच तिच्या नातेवाईकांची वाट पाहत उभे होते. या नंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील घरच्यांनी एकटी महिला आणि कुणी लहान मुले असेल तर त्यांना असे एकटे सोडू नये एवढी निष्काळजी होऊ नये अशी विनंती त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.