Pune News : वृद्ध आईच्या अंत्ययात्रेत मुलानेही सोडले प्राण, पुण्यातील घटनेने हळहळ

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील पेरणे गावातून हृदय पिळवटून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने 65 वर्षीय मुलाने तिच्या अंतयात्रेतच आपले प्राण सोडले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. कृष्णाबाई हनुमंत वाळके (वय 92) असे निधन झालेल्या आईचे नाव आहे, तर मुलगा शिवाजी वाळके (वय 65) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या पाठोपाठ मुलाची देखील अंतयात्रा निघाल्याने पेरणे गावावर मात्र शोककळा पसरली.

शिवाजी वाळके हे पंचक्रोशीत शिवा अण्णा म्हणून परिचित होते. त्यांनी पाच वर्ष गावचे सरपंच पद देखील भूषवले आहे. त्यांनी सलग दहा वर्षे पायी वारी देखील केली आहे. गावातील यात्रा-जत्रा, अखंड हरिनाम सप्ताह, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, जयंती, पुण्यतिथी अशा कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.

PCMC Election 2022 : मतदार वाढल्याने 17 जूनपर्यंत प्रारुप यादी प्रसिद्ध करणे अशक्य, महापालिकेने मागितली आठ दिवसांची मुदत

दरम्यान रविवारी रात्री त्यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीत अंतरीची तयारी सुरू असतानाच शिवाजी वाळके यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा एकापाठोपाठ एक असा मृत्यू झाल्याने पेरणी गावावर मात्र मोठी शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.