Pune : मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्यांना जाब विचारल्याने एकाचा खून

एमपीसी न्यूज- मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने चिडून जाऊन दोघांनी एकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील एम्पाअर हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

चंदन जयप्रकाश सिंग (वय 36) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी टिपूसुल्तान फिरोज मंसुरी आणि अनिरुध्द अमरीश राठोड या दोघांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचा भाऊ राहुल जयप्रकाश सिंग यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चंदन हा मैत्रिणीसोबत आज सायंकाळी एम्पाएर हॉटेलसमोर थांबला होता. यावेळी त्याठिकाणी आलेले वरील आरोपी चंदनच्या मैत्रिणीकडे एकटक पाहत होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या चंदनला आरोपींनी मारहाण केली. तर आरोपी अनिरुद्ध याने खाली पडलेल्या चंदनच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही पसार झाले आहेत. अधिक तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.