Chinchwad : आर्थिक वादातून चिंचवड मध्ये एकाचा खून

एमपीसी न्यूज – पैशांच्या दिवाण-घेवाणीच्या (Chinchwad )कारणावरून एका व्यक्तीवर शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

 

प्रकाश मारुती म्हेत्रे (वय 40) असे खून झालेल्या (Chinchwad )व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी कमलेशकिशोर रमेश भट (वय 40) याला ताब्यात घेतले आहे.

Nigdi : दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि कमलेशकिशोर यांच्यामध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून सोमवारी सायंकाळी वाद झाला. त्या कारणावरून कमलेशकिशोर याने प्रकाश यांच्या मांडीवर हत्याराने वार केले. त्यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.