Nigdi : दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज – दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ (Nigdi )झोपडीधारकांना घर द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समन्वयक विलास घाडगे यांनी दिला. या एसआरए प्रकल्पात 100 सदनिकांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुर्गा नगर एसआरए प्रकल्पाचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Nigdi )आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने सुरू केले आहे. दुर्गानगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांसाठी 360 सदनिका बांधून तयार आहेत. त्यापैकी काहीचे वाटप झाले आहे.

परंतु दुर्गा नगर येथील झोपडी झोपडीधारकांना डावलून महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील कर्मचारी, अधिकारी, पोलीस व या भागातील पुढारी मंडळी मूळ झोपडीधारकांना डावलून बेकायदेशीररित्या दुर्गा नगर येथील त्यांच्या झोपड्या पाडत आहेत. याबाबत समन्वयक विलास घाडगे यांनी वेळोवेळी एसआरए अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.
Pimpri: शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी महिला हित पहावे- ॲड. लक्ष्मण रानवडे

35 झोपड्या बाकी आहेत. त्या पाडण्यासाठी विकसक यांनी स्थानिक गुंड यांना हाताला धरून रात्री सात नंतर झोपड्या पाडण्याचे बेकायदेशीर काम केले आहे. या झोपडीधारकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांना त्यांच्या न्याय हक्काची झोपडी मिळालीच पाहिजे अशी मागणी करीत रविवारी दुर्गा नगर येथे प्रशासनाचा निषेध करण्यात आला.   यावेळी विलास भागवत घाडगे, दीपक हणमंत हलूरकर, बाबासाहेब भगवान गोरे, अब्दुल जमादार, सीता विठ्ठल नांदवते, बाबासाहेब कदम, आतिश दिलीप कदम, प्रशांत दिलीप कदम, प्रमिला पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.

विलास भागवत घाडगे म्हणाले की, रात्री अपरात्री दुर्गा नगर येथील उर्वरित झोपडीधारकांच्या झोपड्या पाडून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याविषयी दुर्गा नगर येथील उर्वरित झोपडीधारकांनी रविवारी दुर्गा नगर येथे महानगरपालिकेचा निषेध करीत आंदोलन केले. तसेच मूळ झोपडीधारकांना सदनिका द्याव्यात अशी मागणी केली अन्यथा  आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.