Leauge 2022 : पूर्वा गायकवाड पुणे जिल्हा फुटबॉल संघाची कर्णधार

एमपीसी न्यूज – मध्यरक्षक पूर्वा गायकवाड हिच्याकडे 18 सदस्यीय पुणे जिल्हा फुटबॉल संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आंतर-जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी हा संघ जाहिर करण्यात आला. स्पर्धा 17 वर्षांखालील गटाची असून नाशिक येथे ही स्पर्धा होणार आहे.

संघाच्या मुख्य प्रशिक्षक पूजा धुमाळ आणि व्यवस्थापक आशिष कटरा यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवस झालेल्या सराव शिबिरातून या संघाची निवड करण्यात आली. सिरील आशिर्वदम, मॅथ्यू सुसेनाथन, अमर परदेशी आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रदिप परदेशी हे देखिल या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या मोहिमेस अकोला वि. हिंगोली यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध सुरवात होणार आहे. हा सामना 14 मे रोजी होईल.

संघ – पूर्वा गायकवाड (कर्णधार), राहिन शेख (उपकर्णधार), अस्मी कुलकर्णी, वेदांती हरिपूरकर, महेक शेख, सिमरन शेर्ला, सिद्धि पाटिल, संजना गुप्ता, पूजा गुप्ता, रोशनी पंडित, आदिती ननानवरे, आदिती शितोळे, नियती अगरवाल, स्नेहा सांडभोर, पियुषा नरके, दिव्या बसंतानी, तानिया गायकवाड, श्वेता मालंगवे, पूजा धुमाळ, व्यवस्थापक – आशिष कटारा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.