Rahatani Crime News : चेहऱ्याचा मास्क काढल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणा-या तरुणाला दोघांनी आवाज दिला. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण थांबला आणि त्याने चेह-याचा मास्क काढला. यावरून दोघांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याचा चावा घेतला. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी रहाटणी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली.

बालाजी तुकाराम शिंदे (वय 23, रा. रहाटणी. मूळ रा. एकुरका, पो. कल्लुळ, ता. उदगीर, जि. लातूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज नामदेव सुतार, आशिष उर्फ बारक्या शिंदे (रा. रहाटणी फाट्याजवळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी शिंदे रहाटणी येथील सार्वजनिक शौचालयाजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज दिला. त्यामुळे फिर्यादी थांबले आणि त्यांनी चेह-याचा मास्क काढला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा चावा घेऊन जखमी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.