Rahatani : न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत सर तसेच शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गेवारे आणि प्रणाली मगर यांनी केले व आभार रोशनी गुप्ता यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.