Raigad News: रोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून तातडीने आरोपपत्र दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल. आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (सोमवारी, दि. 24) येथे दिली.

रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडित कुटुंबियांची गृहमंत्री देशमुख यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव आदी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल.

हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.