Pune News : विसर्जनच्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याचा कंटेनर वापरला : मनसेचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने गणेश विसर्जनसाठी फिरत्या हौदांचे जे रथ तयार केले आहेत, त्यामध्ये कचऱ्याचा कंटनेर वापरल्याचा आरोप मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे. तर, यावर राजकारण करणे बरोबर नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना सुनावले.

विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय आणि मंडई परिसरात फिरणाऱ्या हौदांचा मनसेने दाखला दिला आहे. मात्र, कोणत्याही फिरत्या हौद रथावर अशाप्रकारे कचऱ्याचा कंटेनरचा वापर केला गेला नाही, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक म्हणाले.

पुणे शहरात गणेश विसर्जनाकरिता जे फिरते हौद रथ तयार करण्यात आले आहेत, त्या सर्व रथांमध्ये नवीन टाक्याच ठेवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना गणरायाचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन महापौरांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

कोरोनाचे संकट लक्षात घेता विसर्जन करण्यासाठी गर्दी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.