Rajesh Tope Mother Died: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृशोक 

एमपीसी न्यूज – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

“माझ्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे वय 74 यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.त्यांच्यावर दि.2 ऑगस्ट रोजी सायं.4 वा.क.अं. टोपे.स.स.सा.का. अंकुशनगर ता. अंबड जि. जालना अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील.”, असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व इतर मंत्री व राजकारणी लोकांनी राजेश टोपे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे.

शारदाताई अंकुशराव टोपे जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.2) अंकुशनगर, ता.अंबड, जि. जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.