Corona Latest Update : पुणे, मुंबईत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण; मास्क वापरण्याचे टोपे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुणे, मुंबई,पालघर, रायगड येथे कोरोना पॉसिटीव्हविटीचा दर हा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावेत असे आवाहन सोमवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. मात्र, राज्यात सध्या तरी मास्कची सक्ती असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आषाढी वारीचे नियोजन जवळपास होत आले आहे, त्यामुळे वारी होणारच, असेही टोपे म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात पुणे, मुंबई,पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून मास्कचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारच्यावतीने केले. त्याचबरोबर सध्या तरी राज्यात मास्क सक्ती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री धनंजय मुंडे यांना ताप येत आहे. त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आलेली असून त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, असे टोपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.