Ravet news: जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या महिला दलालास अटक व दोन पीडित मुलींची सुटका

एमपीसी न्यूज: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दोन पिडीत मुलींकडून जबरदस्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिला दलालावर कारवाई करून दोन पिडीत मुलींची सुटका केली आहे.
पूजा उर्फ चंदा विश्वकर्मा, वय 25 वर्षे, रा. सध्या वडगाव शेरी, मुळ रा. मुंबई या आरोपी महिला दलालला ताब्यात घेतले आहे. तिचे विरोधात रावेत पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 370 (3) सह नैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या आधी मध्ये वर्षा व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने अनैतिक मानवी वाहतूक विभागाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने गोपणी माहिती काढत असताना 19 ऑक्टोबर 2022 रोजी रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तसेच जास्त पैशाचे अमिष दाखवून अशा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालावर कारवाई करण्यात आली आहे.
19 ऑक्टोबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना नावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा असे नाव सांगून मोबाईल वरून कॉल व व्हाट्सअँप कॉल करून मुलींचे फोटो पाठवून वेगवेगळ्या हॉटेल व लॉजेसवर मुलींना स्वतः घेऊन जाऊन त्यातील एका मुलीची निवड करण्यास सांगून वेश्याव्यावसाय करवून घेते अशी माहिती मिळाली होती.

अशा मिळालेल्या माहितीवरून रावेत हद्दीत बनावट ग्राहक पाचारण करून हॉटेल मध्ये रूम बुक करून सापळा रचला असता महिला आरोपी पूजा हि  तिच्यासोबत दोन मुली घेऊन आली व त्यातील एक मुलिची वेश्यागमनाकरिता बनावट कस्टमर यास निवड करण्यास सांगून त्याबदल्यात तीने स्वतः रक्कम स्वीकारली. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागातील पोलीस अधिकारी, पोलिस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून महिला आरोपी पूजा हिला तब्येत घेऊन दोन पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. यातील एक पिडीत नेपाळची तर दुसरी पिडीत मुलगी मुंबईची आहे.
आरोपी पूजाच्या जवळ 300 रुपये रोख रक्कम, 30 रुपयाची इतर साहित्य व 5,000 रुपये किंमतीचा एक मोबाईल फोन मिळाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त        (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.