Rawet : संस्कार प्रतिष्ठानतर्फे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि एस बी पाटील पब्लिक स्कूल रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. एस बी पाटील पब्लिक स्कूलपासुन रावेत आणि संपूर्ण रावेत गावातुन प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

या मतदार जनजागृती अभियानाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मधुबाला गैरोला यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “कर्तव्यात करु नका कसूर, मतदान करुन लोकशाहीचा दूर करा अडसर” “डरने की क्या बात है पुलीस प्रशासन साथ है” “अच्छा मतदाता का हौसला एक मत से हो फैसला” अशा घोषणा देऊन जनजागृती केली.

यावेळी या अभियानाचे संयोजन डॉ मोहन गायकवाड, पद्मावती बंडा, धनाजी पाटील, कुलदीप घाडगे, प्रथमेश इनामदार, रचना सिसोदिया, रिचा अरोरा, अंजली गुगले, लिना वर्गीस यांनी केले. या अभियानात पालकही सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.