Red Zone Nigdi : रेड झोन बाधित क्षेत्रातील लोकांचा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा – सतिष मरळ

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील देहूरोड (Red Zone) दारुगोळा कारखाना व डेपोच्या रेड झोन बाधित क्षेत्रांचे सीमांक करून स्थानिक नागरिकांना त्यांचे घर/ दुकाने बाधित आहेत, की नाहीत याबाबतचा असलेला संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा अशी मागणी सतिष मरळ, शिवसेना विभाग प्रमुख निगडी (यमुनानगर, सेक्टर 22) यांनी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयात दिले आहे.

देहूरोड दारुगोळा कारखाना व डेपोमुळे रेड झोन निर्माण झाला असून त्यांच्या (Red Zone) सीमा भिंतीपासून 2000 यार्डपर्यंत रेड झोनची हद्द निश्चित करण्यात आली आहे. 2019 च्या रेड झोनच्या नकाशानुसार पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील किवळे, रावेत, निगडी, यमुनानगर, सेक्टर 22, त्रिवेणीनगर, रुपीनगर, तळवडे, शरदनगर, मोरेवस्ती, साने चौक व कृष्णनगर येथील काही भाग रेड झोन बाधित होत आहे.

त्यात निगडीतील सर्वे नंबर 56, 57 आणि 63 (सेक्टर नंबर 20) हा भाग रेड झोनमध्ये येतो. मात्र, असे असतानाही या सर्वे नंबरमधील शरदनगरमध्ये ‘एसआरए’ प्रकल्पला परवानगी देण्यात येऊन बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत मरळ यांनी मुंबई उच्च न्यायालत जनहित याचिका दाखल केली असून या याचिकेत महाराष्ट्र सरकार, भारत सरकारचा संरक्षण विभाग, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन(एसआरए), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड नगर भुमापन कार्यालय आणि रेनबो डेव्हलपरस यांना प्रतिवादी केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार, (पीसीएनटीडीए), नगरभूमापन अधिकारी यांना परवानगी कशी दिली, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

दरम्यान, हा खटला सुरु असताना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर 2019 रोजी एसआरए प्रकल्प सुरु असलेला भाग रेड झोन हद्दीत येत नसल्याचे पत्र पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. शरदनगर मधील 7570.57 क्षेत्रापैकी 329.66 चौ. मी. क्षेत्र रेड झोन बाधित असून या क्षेत्राबाहेर ‘एसआरए’ प्रकल्प सुरु असल्याचे या पात्रात दिले आहे. तर, यमुनानगर देखील हद्दीबाहेर असेलच अशी यमुनानगरकरांची धारणा आहे.

शिवाय त्रिवेणीनगर, कृष्ण नगर, चिखलीतील मोरे वस्ती, साने चौक हा (Red Zone) अंतराने दूर असलेला भागही रेड झोनबाहेर असेल. त्यामुळे पिंपरी चिंचवड रेडझोनची नेमकी हद्द कुठपर्यंत आहे? त्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी रेड झोन बाधित जनतेची आग्रही मागणी देखील आहे.

Moshi news : साईकृपा कॉलनीतील मैला मिश्रीत  पाण्यासाठी बंदिस्त ‘ड्रेनेज’ लाईन टाका –  अण्णा जोगदंड

या पत्रात मरळ पुढे म्हणतात, की शरदनगरमध्ये सुरू असलेल्या ‘एसआरए’ गृह प्रकल्प रेड झोन हद्दीत येत नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाला कळविले आहे. मोठ्या बांधकाम व्यावसायिकासाठी आणि त्याच्यामागे असलेला राजकीय मंडळींसाठीच जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिले. यावरून प्रशासन बिल्डर आणि राजकीय मंडळींसाठी तत्परतेने काम करीत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे व तसे आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता महापालिका हद्दीत नेमका कुठपर्यंत आणि कोणत्या सर्वे नंबर मध्ये, कोणत्या प्लॉट नंबर मध्ये रेड झोन आहे, त्याची क्षेत्रफळानुसार सविस्तर माहिती जनतेसाठी जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती मरळ यांनी केली आहे.

यमुनानगर मधील नागरिकांनी प्राधिकरणाकडून घरे घेतली आहेत. हा भाग रेड झोनमध्ये येत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांची विक्री करता येत नाही, लोन मिळत नाही, वारसाच्या नावाने मालमत्ता नोंद देखील करता येत नाही. असे असताना रेड झोनमध्ये येत असलेल्या शरद नगरमध्ये हे ‘एसआरए’ अंतर्गत प्रकल्पाला परवानगी जशी देण्यात आली. तसेच न्याय झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि एसआरएला तोच यमुना नगर व लगत असलेल्या सर्व परिसर वासियांनाही द्यावा, अशी येथील नागरिकांची आग्रही मागणी असल्याचे मरळ यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.