Dehuroad News: पोलिसांनी ‘एफआयआर’मधील गंभीर कलम वगळले – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – वरिष्ठांच्या निर्देशानंतर देहूरोड पोलिसांनी (Dehuroad News) एफआयआर नोंदवला. मात्र गंभीर कलम वगळून प्रकरणाचे गांभीर्य कमी केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केला आहे. पीडीताने रमेशन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.

याबाबतची माहिती देताना रमेशन म्हणाले, विकासनगर येथील एकाने सौदी अरेबियातील नोकरी सोडून घरी परतल्यानंतर पत्नीकडून छळ सुरू असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad News)दिली होती. खोट्या खटल्यात अडकवण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे  या भीतीने हा पिडीत सोलापूरला निघून गेला. फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याच्या पत्नीने पीडिताचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. त्यानुसार कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर तिचे आणि त्यांच्या मुलांचे नाव लावले. ज्यामध्ये 3 गुंठे खुला भूखंड आणि दोन फ्लॅटचा समावेश असल्याचा आरोपही रमेशन यांनी केला.

Red Zone Pimpri : रेड झोन बाधित क्षेत्रातील लोकांचा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा – सतिष मरळ

पीडिताने सर्व पुराव्यांसह देहूरोड पोलीस स्टेशन गाठले. परंतु, पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, देहूरोड पोलिसांनी जाणीवपूर्वक गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी आरोपीच्या बाजूने एफआयआर दाखल केला. गंभीर गुन्ह्यांचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप रमेशन यांनी केला.

याबाबत श्रीजीत रमेशन यांनी गंभीर गुन्ह्यात प्रकरणाचे गांभीर्य कमी करणा-या दोशी पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी डीजीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.