Pimpri News : प्राधिकरणातील भूमिपुत्रांना 15 दिवसांत जमीन परतावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जागा देणाऱ्या शहरातील भूमिपुत्रांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याच्या यापूर्वी घेण्यात (Pimpri News) आलेल्या निर्णयाची 15 दिवसांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरण बाधितांच्या जमीन परताव्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, की राज्यात भाजपाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित भूमिपुत्रांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आणि महापालिकेतील प्रशासक राजवटीत याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

Pune News : चंद्रकांत दळवी, डॉ. शहा यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’

यासंदर्भात आमदार लांडगे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या उपस्थित 1 जुलै 2019 रोजी बैठक झाली होती. परताव्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जागा नसल्यामुळे 50 टक्के जागा आणि 50 टक्के ‘एफएसआय’ देण्याचे बैठकीत ठरले होते. त्यानुसार संपादित क्षेत्राच्या 6.2 टक्के एवढी जमीन जागामालकास वाटप करण्यात यावी. तसेच, अशा जमिनीचा परतावा करताना दोन चटई क्षेत्र एवढा निर्देशांक मंजूर करण्यात यावा. त्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करावी, असा निर्णय झाला होता. मात्र, गेल्या अडीच वर्षांत याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सभागृहात केली. त्यास उद्योगमंत्र्यांनी भूमिपुत्रांना दिलासा देणारी घोषणा केली.

जवळपास 40 वर्षे प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील भूमिपुत्रांना मोठा दिलासा दिला आहे. (Pimpri News) फडणवीस यांच्या उपस्थितीत अडीच वर्षापूर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.