Chikhali : पादचारी तरुणास लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचे हात धरून खिशातील पैसे आणि मोबाईल जबरदस्ती काढून घेतला. ही घटना शनिवारी ( दि. 27) रात्री सव्वानऊच्या सुमारास देहू आळंदी रस्त्यावर लक्ष्मी चौक येथे घडली.

रणजितकुमार दीनदयाल कापरी (वय 24, रा. महात्मा फुलेनगर, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रणजितकुमार शनिवारी रात्री देहू आळंदी रस्त्यावरून पायी जात होता. दरम्यान पाठीमागून काळ्या पल्सरवर आलेल्या चोरटयांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. रणजितकुमार पत्ता सांगत असताना दुचाकीवरील एका चोरट्याने त्यांचे हात धरले तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील दोनशे रुपये आणि पाच हजरांचा मोबाईल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.