Water supply Scheme : वरसोली-पांगळोली येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 2 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वरसोली व पांगळोली येथील नळ पाणीपुरवठा योजनांच्या (Water supply Scheme) कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपराव्यामुळे सुमारे 2 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या पाणीपुरवठा योजनांच भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 8) महिलांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

Corona Vaccine : पालिकेच्या सांगवी रुग्णालयात 2.67 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस

 

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत वरसोली नळ पाणी पुरवठा  योजनेसाठी (Water supply Scheme) 1 कोटी 99 लाख रुपये निधी व पांगळोली योजनेसाठी 62 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.  या निधीतून वरसोली येथे 2 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अंदाजे सोळा किलोमीटरची वितरण व्यवस्था व पांगळोली येथे 85 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व सुमारे तीन किमी पाणी वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

 

 

या भूमिपूजन समारंभप्रसंगी पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सरपंच सारिका खांडेभरड, माजी पंचायत समिती सदस्य महादु उघडे, माजी नगराध्यक्ष नारायण पाळेकर, संजय खांडेभरड, उपसरपंच सीता ठोंबरे, सदस्य रजनी कुटे, अरुणा खांडेभरड, मिना शिंदे, अरविंद बालगुडे, दत्ता खांडेभरड, विलास चौधरी, बबन खरात, कल्पेश मराठे, उमेश शेळके, साजन दळवी, तसेच आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.