Online Fraud : महिलेने मोबाईलमधील कोड विचारून तरूणाच्या क्रेडिट कार्डमधून 99 हजार केले लंपास

एमपीसी न्यूज – क्रेडिट कार्डचे (Online Fraud) वार्षिक चार्जेस कमी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर सर्विसमधून बोलत असल्याचे सांगून एका महिलेने तरुणाची फसवणूक केली. तरुणाकडून मोबाईलवर आलेला कोड क्रमांक विचारून क्रेडिटकार्डद्वारे 99 हजार 800 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. 30 एप्रिल रोजी हा प्रकार घडला आहे.

दीपक शिवाजी जाधव (वय 31, व्यवसाय -नोकरी रा. येलवाडी, सांगुर्डे, ता. खेड ) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत चाकण म्हाळुंगे पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Corona Vaccine : पालिकेच्या सांगवी रुग्णालयात 2.67 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस

दीपक जाधव यांना (88 19 90 52 17 ) या नंबरवरून फोन करण्यात आला. यावरून एक महिला व्यक्तीने मी आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर सर्व्हिसमधून अधिकारी बोलत आहे.तुमच्या क्रेडिट कार्डची (Online Fraud) वार्षिक चार्जेस कमी करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर चार अंकी कोड येईल, तो आम्हाला सांगा असे सांगितले.

त्यावेळी दीपक यांनी तुम्ही कोड कसा काय मागता असे विचारले असता.  तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कोड पाठवला आहे तो मागत आहे.  तुमचे सीसीव्ही मागत नाही असे सांगितले. यावर विश्वास ठेवून दीपक यांनी मोबाईलवर आलेला कोड क्रमांक त्यांना सांगितला.

हा क्रमांक सांगितल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 99 हजार 800 रुपयांचे ट्रांजेक्शन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.