MLA Sunil Shelke : महागाव मधील कातकरी बांधवांना घरपोच मिळाले जातीचे दाखले

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांनी काही महिन्यांपूर्वी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील कातकरी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतले होते. केवळ अर्ज भरून न घेता पुढील प्रक्रियेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा देखील करण्यात आला. त्यातूनच आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांनी पवन मावळमधील महागाव येथील 35 कातकरी बांधवांना शुक्रवारी (दि. 9) जातीच्या दाखल्यांचे घरपोच वाटप केले.

 

Water supply Scheme : वरसोली-पांगळोली येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 2 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध

 

कातकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांनी राबविले आहेत. दुर्गम भागातील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यांचा वेळही वाया जातो व रोजंदारीवर उपजिवीका असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची अनास्था त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आमदार शेळके यांनी यासाठी योग्य नियोजन केल्यामुळे अल्प कालावधीतच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत.

आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांचे सहकारी गावातील कातकरी वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांना जातीचे दाखले देत आहेत. कातकरी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु जातीचा दाखला नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येतात.परंतु आता जातीचा दाखला उपलब्ध झाल्याने मावळातील कातकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. शुक्रवारी महागाव येथील 35 कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जातीचे दाखले मिळवून दिल्याबद्दल कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.

 

 

 

 

यावेळी उपसरपंच स्वाती बहिरट, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ युवती अध्यक्षा आरती घारे, माजी उपसरपंच रामदास घरदाळे, माऊली निकम, संतोष घारे, दशरथ सावंत, भानुदास बहिरट, केशव सावंत, रामदास घारे, आमदार सुनिल शेळके यांचे कार्यालय प्रतिनिधी सचिन वामन, नबीलाल आत्तार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.