Pune News : खंडणी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचा जामीन फेटाळला

रवींद्र बऱ्हाटे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

एमपीसी न्यूज – पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे 2 कोटी रुपये आणि जागा मागत दीड लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज सकाळी या प्रकरणावर सुनावणी झाली.

या प्रकरणी रवींद्र ब-हाटे , बडतर्फ हवालदार शैलेश जगताप, अमोल चव्हाण, पत्रकार देवेंद्र जैन आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच रवींद्र बहाटे पसार झाला. तर शैलेश जगताप, अमोल चव्हाण, देवेंद्र जैन आणि संबंधित महिलेला पोलिसांनी तात्काळ अटक केली.

त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जमीन मंजूर करण्यात आला.

ब-हाटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याचा जमीन फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.

आज सकाळी झालेल्या सुनावणीमध्ये त्याचा जमीन फेटाळण्यात आला. रवींद्र ब-हाटे, शैलेश जगताप, अमोल चव्हाण, देवेंद्र जैन यांच्यासह इतरांवर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

रवींद्र बऱ्हाटे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.