Talegaon : शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत रुपाली खोत, बालाजी आरदवाड व अभिषेक शेलार

Talegaon: Rupali Khot, Balaji Aradwad and Abhishek Shelar in District Merit List in NMMS Scholarship Examination नवीन समर्थ विद्यालय व अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरचे यश

एमपीसी​ न्यूज ​- मावळ तालुक्यातील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयातील रुपाली भरत खोत हिने तर अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमधील बालाजी विक्रम आरदवाड  व अभिषेक शशिकांत शेलार या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. 

रुपाली भरत खोत या विद्यार्थिनीला इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वार्षिक बारा हजार रुपये म्हणजे चार वर्षात शिक्षणासाठी 48 हजार रुपये मिळणार आहे. या विद्यार्थिनीला शाळेतील वंदना मराठे यांचे मार्गदर्शन मिळाले.

या विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे,शालेय समितीचे महेशभाई शहा मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे, ज्येष्ठ अध्यापक पांडुरंग पोटे, सुदाम वाळुंज, छाया सोनवणे आदी सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

तळेगाव दाभाडे येथील अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमधील बालाजी विक्रम आरदवाड  व अभिषेक शशिकांत शेलार यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा  गुणवत्ता यादीत स्थान पटकावले तसेच विद्यालयाचे पाच विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.

या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वार्षिक बारा हजार रुपये प्रमाणे चार  वर्षांत शिक्षणासाठी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत.

विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापक राधाकृष्ण येणारे आणि मुख्याध्यापक भगवान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्गशिक्षिका दीप्ती बारमुख, आशा आवटे, अनिता नागपुरे, वर्षाराणी गुंड, मीना व्यवहारे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार (सहसचिव), पालक सुरेशभाई शहा यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.