Talegaon Dabhade : भारत हा सौर ऊर्जेचा देश – अविनाश बवरे

एमपीसी न्यूज – आपला भारत देश विषुववृत्ताजवळ आहे. सूर्याच्या उत्तरायणामध्ये व दक्षिणायनामध्ये लांब सूर्यकिरणे पडतात. ती अतिशय कार्यक्षम असतात त्यामुळे उर्जा जास्त तयार होते. वर्षातील 365 दिवसांपैकी 325 दिवस भारत देशात सूर्यप्रकाश मिळतो. एवढा सूर्यप्रकाश कुठल्याच देशात मिळत नाही. म्हणून भारत देश सौरउर्जेचा देश म्हणून गणला जातो, असे मत पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस अविनाश बवरे (Talegaon Dabhade) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील  ॲड.पु. वा परांजपे विद्या मंदिर या शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बवरे बोलत होते. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनातून ॲड.पु. वा परांजपे विद्या मंदिरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला 1 मे निमित्त ध्वजारोहण व सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संतोष खांडगे,शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार,संस्थेचे संचालक महेश शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, शालेय समिती सदस्य  अशोक काळोखे,आनंद दादा भेगडे,  पत्रकार प्रभाकर तुमकर, माजी विद्यार्थी अंकुश गुंड, दीपक अवसरकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोगऱ्याची रोपे  देऊन सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

बवरे म्हणाले की, आपण याच शाळेत शिकलो. या शाळेने शिक्षण व संस्कार दिले. त्यामुळेच इथपर्यंत आलो. समाजात त्याचा चांगलाच उपयोग झाला. शाळेतील कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम असल्यासारखेच आपल्याला वाटते. विशेष म्हणजे शाळेने बोलावले हा माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे.

 

प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांनी आपल्या मनोगतात सौर ऊर्जा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी या नात्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची व ध्वजारोहण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विद्यालयाच्या (Talegaon Dabhade) प्रगतीचा आढावा तर घेतला तसेच महाराष्ट्र दिन व शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

Today’s Horoscope 03 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

संस्थेचे सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी देखील सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या व लवकरच शाळेचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा होणार असल्याची माहिती दिली. शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे यांनी कामगार दिनाच्या सर्व अध्यापकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले तर  आभार पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.