Today’s Horoscope 03 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

  • आजचे पंचांग – वार – बुधवार. 03.०5.2023 (Today’s Horoscope 03 May 2023)
  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 1..30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल. 
  • आजचे नक्षत्र – हस्त.
  • चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – (शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल. आरोग्याच्या काही तक्रारी मात्र दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

वृषभ (शुभ रंग- मोतिया)

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागेल.

मिथुन (शुभ रंग- हिरवा)

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढच होईल. आज घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमा-खर्चाचा तराजू समतोल राहील. आज गृह सौख्याचा दिवस.

कर्क (शुभ रंग- पांढरा.) (Today’s Horoscope 03 May 2023)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजारधर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

सिंह (शुभ रंग- लाल)

धनस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस आहे.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करणार आहे.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

आज काहीसे लहरीपणाने वागाल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकणार आहेत. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज स्वतःवर थोडा संयम ठेवण्याची गरज आहे.

वृश्चिक (शुभ रंग-आकाशी)

आज हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी अनावश्यक खर्चही कराल.

धनु- (शुभ रंग- राखाडी) (Today’s Horoscope 03 May 2023)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

मकर ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% असेल. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

कुंभ (शुभ रंग – भगवा)

जे काय चाललंय ते बरच म्हणायला हव. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह बाळगून चालणार नाही. कोणतेही अनैतिक व्यवहार टाळा. आज सासुरवाडीकडून मात्र एखादा धनलाभ होऊ शकतो.

मीन -(शुभ रंग — स्ट्रॉबेरी)

वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावणे टाळा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.